अष्टभुजा देवी मंदीराजवळ आजपासून संगीत भागवत कथा, अखंड नाम संकीर्तन सप्ताह


भुसावळ : शहरातील अष्टभुजा देवी मंदीराच्या जवळ (कै) बाबूराव नामदेव धांडे याच्या स्मरणार्थ श्रीमद संगीत भागवत कथा व अखंड नाम संकीर्तन सप्ताह सोहळ्याला रविवार, 17 पासून सुरूवात झाली. 24 पर्यंत सप्ताह चालणार आहे.

भाविकांना लाभ घेण्याचे आवाहन
शहरातील अष्टभुजा देवी मंदिराजवळ श्रीमद संगीत भागवत कथा व अखंड नाम संकीर्तन सप्ताह सोहळा होत आहे. यात सकाळी 5 ते 6 काकडा आरती, दुपारी 1 ते 5 श्रीमद भागवत कथा, संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठ, रात्री 8 ते 10 या वेळात दररोज वेगवेगळ्या महाराजांचे कीर्तन होत आहे. भागवत कथाकार दत्तात्रय महाराज साकरीकर तर महाप्रसाद 24 डिसेंबरला दुपारी 12 ते 3 या वेळात तर दिंडी सोहळा सुध्दा 24 डिसेंबरला संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत होईल. काल्याचे कीर्तन याच दिवशी रात्री 8 ते 10 या वेळात होणार आहे. भाविकांनी कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष नितीन धांडे, माजी नगरसेविका मीनाक्षी धांडे यांनी केले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !