भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा सरचिटणीसपदी वैशाली सरदार


भुसावळ :  भारतीय बौद्ध महासभेची जिल्हा महिला कार्यकारणी निवडीबाबत नुकतीच जळगावातील वाघ नगरातील यशवंत भवनात बैठक झाली. प्रदेशाध्यक्षा स्वाती शिंदे, उपाध्यक्ष रागिणी पवार, संघटक लता तायडे व राज्य उपाध्यक्ष के. वाय. सुरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा महिला जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली.

जिल्हाध्यक्षपदी प्रियंका अहिरे
जिल्हाध्यक्षपदी प्रियंका अहिरे तर सरचिटणीसपदी वैशाली सरदार यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारीणीत उपाध्यक्ष सुमित्रा सर्वटकर, करुणा नरवाडे, सुनीता वानखेडे, संघटक वनमाला हिवाळे, हिशोब तपासणीस नंदा बोदडे, कार्यालयीन सचिव सुषमा इंगळे, सचिव (संस्कार) आशा पोहेकर, छाया सुरवाडे, सचिव (पर्यटन व प्रचार) कविता सुरवाडे, विद्या झनके, सचिव (संरक्षण)पल्लवी गुरुचळ, वनिता साळवे, संघटक सिंधू निकम, ललिता बोदडे, भारती तायडे, रंजू होलार याप्रमाणे जिल्हा महिला कार्यकारणीची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस आनंद ढिवरे, कोषाध्यक्ष शैलेंद्र जाधव, हिशोब तपासणीस ए.टी.सुरळकर, उपाध्यक्ष सुशीलकुमार हिवाळे, सचिव वसंत लोखंडे, संघटक बी.के.बोदडे, प्रकाश सरदार, कार्यालयीन सचिव सुभाष सपकाळे, लेफ्ट कर्नल युवराज नरवाडे, रमेश साळवे, अरुण तायडे, उत्तम सुरवाडे, शांताराम मोरे, प्रमोद सुरवाडे इत्यादी उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !