बर्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग सावदा-रावेर शहरालगतच हवा : फैजपूरात प्रांताधिकार्यांना निवेदन
फैजपूर : बर्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाला फैजपूर, सावदा, रावेर, यावल शहरातून वगळण्यात आल्याने जनभावना संतप्त झाल्या आहेत. शहरातील भाजप पदाधिकार्यांतर्फे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देवयानी यादव यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार बर्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग फैजपूर, सावदा, रावेर, यावल या शहरांना सोडूनच करावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देताना माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, माजी नगराध्यक्ष बी.के.चौधरी, नितीन राणे, अनिल तेली, हरेश होले, सुभाष पाटील, नरेंद्र चौधरी, जयश्री चौधरी, प्रमोद चौधरी, कैलास शिवरामे, भावेश मिस्तरी, संतोष कोळी, अतुल कापडे आदींची उपस्थिती होती.







