निंभोरा बस स्थानक परीसरात महिनाभरापासून गटारीचे काम रखडले : वाहतूक कोंडीने संताप


खिर्डी : निंभोरा येथील बस स्थानक परिसरात व वाघोदा बलवाडीकडे जाणार्‍या रस्त्याला लागून खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाने निंभोरा ग्रामपंचायत प्रशासनाच्या मागणीवरून अंदाजीत 68 लक्ष रुपये किंमतीच्या गटारीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू आहे मात्र गेल्या महिन्यांपासून हे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे रस्त्याला लागून पडलेली माती व दगडांमुळे वाहनधारकांना व पायी चालणार्‍या ग्रामस्थांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

तर ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
गावातील बस स्थानकावरील मुख्य रस्त्यावर विशेषतः सावदा, फैजपूर रस्त्याला लागून असलेल्या या रस्त्याने वाहनांची कायम मोठी वर्दळ सुरू असते. यामुळे या भागात या प्रलंबित बांधकामामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. विशेष म्हणजे काही महिन्यांपासून या गटारीच्या बांधकामासाठी हे खोदकाम केले असून स्थानिकांनी त्याला विरोध केल्यामुळे व काही अंशी या ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे या बस स्थानकावरील मुख्य रस्त्याचे हे बांधकाम काही महिन्यापासून प्रलंबित आहे. अस्तित्वात नसलेली गटार दुसर्‍या बाजूने खोदल्याने स्थानिक रहिवाशांनी त्यास विरोध केला. त्यामुळे दिवाळीसारख्या सणांमध्ये सुद्धा या रस्त्याने हे खोदकाम तसेच पडलेले असल्यामुळे वाहनधारकांची प्रचंड कोंडी या रस्त्याने झाली होती. मात्र असे असूनही संबंधित खात्याने याकडे दुर्लक्ष केल्याने या रस्त्यामुळे वाहनधारकांची मोठ्या प्रमाणावर अडचण होत असून सदर बांधलेली गटार तत्काळ पूर्ण करावी यासाठी ग्रामस्थांची मागणी असून संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यास यासाठी वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


वाहनधारकांसह पादचार्‍यांना मनस्ताप
गेल्या महिनाभरापासून हे काम असेच पडून असल्यामुळे वाहनधारक व पायी चालणार्‍या रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रसंगी वाद -विवाद होतात. ठेकेदाराने हे काम प्रलंबित ठेवून अडचणी वाढवल्या असल्याचे निंभोरा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जगजीवन मोरे म्हणाले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !