धनाजी नाना महाविद्यालयात मैदानी स्पर्धा
फैजपूर : धनाजी नाना महाविद्यालयात व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालय मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यात रनिंग, लांब उडी, थाळी फेक अशा विविध स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
उत्कृष्ट खेळाडूंची होणार निवड
या स्पर्धकांमधून स्त्री आणि पुरुष दोन्ही गटातून विभागीय स्पर्धांसाठी उत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. उद्घाटन राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव धनंजय चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी तापी परिसर विद्यामंडळ संचलित फैजपूर संस्थेचे पदाधिकारी एस.के.चौधरी, लिलाधर चौधरी, एस.एस.पाटील ओंकार सराफ, एन.ए.भंगाळे, मिलिंद वाघुळदे, डॉ.पी.डी.पाटील, डॉ.जे.एस.पाटील, प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळदे, क्रीडा संचालक डॉ.जी.एस.मारतडे, जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे क्रीडा संचालक, सहकारी प्राध्यापक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.आर.बी चौधरी यांनी तर सूत्रसंचलन डॉ.सीमा बारी व आभार डॉ.जी.एस.मार्तडे यांनी मानले.




