विविध योजनांमधून भुसावळातील रस्ते विकासाला दिला प्राधान्यक्रम : आमदार संजय सावकारे
आमदार संजय सावकारे : भुसावळातील रींग रोडचे भूमिपूजन
Road development in Bhusawal has been given priority from various schemes भुसावळ : महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेसह विविध योजनांमधून शहरातील विविध भागांमध्ये रस्ता डांबरीकरण करून नागरिकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहे. वैशिष्ट्यूपर्ण योजनेंतर्गत नगरपालिका प्रशासनाला निधी उपलब्ध करून देताना नागरिकांची जास्तीत-जास्त सोय कशाप्रकारे होईल याची काळजी घेण्यात येत असल्याचे प्रतिपादन भुसावळ मतदार संघाचे आमदार संजय सावकारे यांनी येथे केले. भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक सातमधील लोणारी हॉल ते रेल्वे लाईनपर्यंत रिंग रोडचे रस्ता डांबरीकरणाचे रविवारी भुमिपूजन झाले. प्रसंगी आमदार बोलत होते.
सपकाळे दाम्पत्याच्या पुढाकाराला यश
आमदार सावकारे म्हणाले की, 50 लाख रुपयांच्या निधीतून या भागात रस्ता डांबरीकरणाची कामे होत आहेत. यामुळे प्रभाग क्रमांक सातमधील नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार आहे. अनेक वर्षापासून या प्रलंबित रस्त्यासाठी माजी नगरसेविकाअनिता सपकाळे तसेच समाजसेवक सतीश सपकाळे यांनी पाठपुरावा सुरू केला होता, असेही आमदार म्हणाले.


यांची होती उपस्थिती
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष युवराज लोणारी, विस्तारक रमाशंकर दुबे, माजी नगरसेवक प्रमोद नेमाडे, राजेंद्र नाटकर, अजय नागराणी, अॅड.बोधराज चौधरी, माजी नगरसेविका अनिता सपकाळे, विशाल जंगले, राहुल तायडे, संदीप सुरवाडे, प्रा.सीमा पाटील, श्रेयस इंगळे, प्रा.धीरज पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.
या भागांना होणार फायदा
रिंगरोडच्या कामामुळे परिसरातील नवीन हुडको कॉलनी, जुनी हुडको, कॉलनी श्रीनगर अष्टविनायक कॉलनी, वामन कॉलनी, अयोध्या नगर परिसर हा थेट दुसर्या बाजूच्या रिंग रोडला जोडला जाणार असून नागरिकांना वाहतुकीच्या समस्यांपासून मुक्तता मिळणार आहे.





