पुणे-मुजफ्फरपुर दरम्यान विशेष रेल्वे गाडी धावणार
भुसावळ : रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून पुणे-मुजफ्फरपुर दरम्यान साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या गाडीच्या 2 फेर्या होणार आहे. रेल्वे गाड्यांना होत असलेली गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून 05286 पुणे-मुजफ्फरपूर सुपरफास्ट एसी साप्ताहिक विशेष एक्सप्रेस दर गुरुवार, 21 आणि 28 डिसेंबर 2023 ला पुणे येथून रात्री 11 वाजता सुटून शनिवारी पहाटे सहा वाजता मुजफ्फरपुर येथे पोहोचेल. 05285 मुजफ्फरपूर-पुणे सुपरफास्ट एसी साप्ताहिक विशेष एक्सप्रेस ही गाडी बुधवार, 20 आणि 27 डिसेंबरला 2023 रोजी मुजफ्फरपुर येथून दुपारी एक वाजता सुटून गुरुवारी रात्री 9 वाजता पुण्यात पोहोचणार आहे. ही गाडी दौंड कॉर्ड लाईन, नगर, कोपरगांव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पंडीत दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर या स्थानकांवर थांबेल. या गाडीला 20 एलएचबी कोच असतील, त्यात एसी फर्स्ट -1,एसी टू- 2, एसी थ्री-11, एसी थ्री इकॉनॉमी -4, जनरेटर कार – 2 असतील. या गाडीचे आरक्षण सोमवार, 18 डिसेंबरपासून सुरू झाले आहे.


