भोळे महाविद्यालयाचे आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत यश
भुसावळ : जळगाव विभाग आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धा धनाजी नाना महाविद्यालयात 14 व 15 रोजी झाल्या. दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील खेळाडूंनी त्यात यश मिळवले.
गुणवंतांचा प्राचार्यांनी केला गौरव
आठशे मीटर धावण्यात दिग्विजय दाभाडे प्रथम तर चारशे मीटरमध्ये द्वितीय आला. दिड हजार मीटर धावण्यात अर्जुन बोयात प्रथम आला. गोळा फेक व थाळी फेकमध्ये दिगंबर कोळी प्रथम आला. चार हजार चारशे मीटर रीले धावण्यात दिग्विजय दाभाडे, तेजस किर्तीकर, अर्जुन बोयत, सौरभ चौधरी, शशांक भालेराव तृतीय आला. थाळी व गोळा फेकमध्ये सुजल शुक्ला प्रथम आली. विजयी खेळाडूंचा गौरव भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.दीपक जैस्वाल, इरफान शेख उपस्थित होते. या खेळाडूंची कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आंतर विभागीय मैदानी स्पर्धा फैजपूरसाठी निवड झाली.







