सातपुड्यातील चारमळी मतदान केंंद्राला प्रांताधिकार्यांची भेट
यावल : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातपुड्याच्या दर्या, खोर्यातील अतिदुर्गम भागातील मतदान केंद्राची पाहणी नवनियुक्त प्रांताधिकारी यांनी केली. सातपुड्यातील चारमळी येथील मतदान केंद्राच्या पाहणीनंतर तेथील नव मतदारांना त्यांनी कार्डचे वितरण केले.
मतदार यादीची पडताळणी
मतदार यादीचे वाचन करून मतदार पडताळणीदेखील त्यांनी केली. आगामी काळात लोकसभा निवडणूक होत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फैजपूरच्या प्रांताधिकारी देवयानी यादव यांनी सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील चारमळी येथील मतदान केंद्राची पाहणी केली. आदिवासी नव मतदारांना या ठिकाणी त्यांनी मतदार कार्डचे वितरण केले. त्यांनी आदिवासी पाड्यावर मतदार यादीचे वाचन करून मतदार यादीत असलेली नावे बरोबर आहे का या संदर्भातील माहिती जाणून घेतली. आदिवासी नागरीकांशी संवाद साधत त्यांच्या अडी-अडचणींसह समस्या जाणुन घेतल्या. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवडणूक नायब तहसीलदार रशीद तडवी, वनपरीक्षेत्र अधिकारी अजय बावणे सह चारमळीचे बीएलओ उपस्थित होते.


ज्येष्ठ मतदारांच्या भेटी-गाठी
तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील स्वातंत्र्यसैनिक कुटुंबातील तसेच तालुक्यातील ज्येष्ठ मतदार वय वर्ष 101 आणि वय वर्ष 92 अशा दोन महिला मतदारांची त्यांनी भेट घेतली व त्यांचा बहुमूल्य मतदार म्हणून सन्मान केला.





