सुरक्षेच्या मुद्यावरून गदारोळ : लोकसभेसह राज्यसभेचे एकूण 78 खासदार निलंबित


नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अठराव्या दिवशी सुरक्षेच्या मुद्यावरून गदारोळ झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी गोंधळ घालणार्‍या 33 खासदारांना निलंबित केल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान. राज्यसभेतही गदारोळ झाल्यानंतर सभापती जगदीप धनखर यांनी 45 विरोधी खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी (22 डिसेंबरपर्यंत) निलंबित केले आहे.

30 खासदारांचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत
लोकसभेत 33 पैकी 30 खासदारांचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. के.जयकुमार, विजय वसंत व अब्दुल खालिक यांचे निलंबन विशेषाधिकार समितीचा रिपोर्ट येईपर्यंत असणार आहे. या तीन्ही खासदारांवर स्पीकरच्या पोडियमवर चढून घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे. या अगोदर 14 डिसेंबरला 14 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर इतक्या मोठ्या संख्येने खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. संसदेची सुरक्षा भेदत केलेल्या घुसखोरीच्या प्रकरणावर विरोधकांनी या अधिवेशनात सरकारला धारेवर धरत गोंधळ घातला.






आतापर्यंत 92 खासदार निलंबित
यापूर्वी 14 डिसेंबर रोजी लोकसभेतून 13 खासदारांना निलंबित करण्यात आले होते. यामध्ये काँग्रेसचे 9, माकपचे 2, द्रमुक आणि सीपीआयच्या प्रत्येकी एक खासदारांचा समावेश होता. याशिवाय राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांनाही 14 डिसेंबर रोजी निलंबित करण्यात आले होते. हिवाळी अधिवेशनापासून एकूण 92 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

लोकसभेतून निलंबित खासदारांची यादी
काँग्रेसचे 11 खासदार, तृणमूल काँग्रेसचे 9, द्रमुकचे 9 आणि इतर पक्षांच्या 4 खासदारांना निलंबित करण्यात आले.

राज्यसभेतून निलंबित खासदार
प्रमोद तिवारी, जयराम रमेश, डॉ. अमी याज्निक, नरेंद्रभाई जे. राठवा, सय्यद नासिर हुसेन, फुलो देवी नेताम, शक्तीसिंग गोहिल, केसी वेणुगोपाल, रजनी अशोकराव पाटील, रणजीत रंजन, इम्रान प्रतापगढ़ी, रणदीप सिंग सुरजेवाला, सुखेंदू शेखर रे, मोहम्मद नदीमुल हक, अबीर रंजन बिस्वास, माँ चीन बिस्वास, मा. बराईक, समीरुल इस्लाम, एम. षणमुगम, एनआर एलेंगो, कनिमोझी एनव्हीएन सोमू, आर गिरीराजन, मनोज कुमार झा, फैयाज अहमद, व्ही शिवसदन, रामनाथ ठाकूर, अनिल प्रसाद हेगडे, वंदना चव्हाण, राम गोपाल यादव, जावेद अली खान, महुआ मांझी, जोस के मणी, अजित कमर भुयान.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !