न्हावीत गोमांस वाहतूक : दोघांना अटक
Trafficking of beef in Navhi : Two arrested फैजपूर : मालवाहू अॅपे रीक्षात गोमांस वाहतूक केली जात असताना फैजपूर पोलिसांनी कारवाई करीत दोन हजारांचे गोमांस जप्त केले. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून माल वाहू रीक्षा जप्त करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
सोमवार, 18 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता न्हावी येथील तडवी वाडा भागाजवळील रोडवर सार्वजनिक जागी पिवळ्या रंगाची मालवाहू अॅपे (क्रमांक एम.एच.19 बी.एम.1443) गोवंश जातीचे पंधराशे रुपये किंमतीचे दहा किलो गोमांस व पाचशे रुपये किंमतीची मेलेल्या जनावराची कातडी आढळल्याने ती जप्त करण्यात आली तसेच 70 हजार रुपये किंमतीची मालवाहू रीक्षा जप्त करण्यात आली. कॉन्स्टेबल राहुल चौधरी यांच्या फिर्यादीनुसार फैजपूर पोलिसात शेख अकरम शेख रऊफ कुरेशी (29, रा.स्वामी नारायण नगर, सावदा) व जाकीर उस्मान कुरेशी (48, रा.तडवी वाडा, न्हावी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल राजेश बर्हाटे करीत आहे. या परीसरात मोठ्या प्रमाणावर गोमांस वाहतूक होत असून पोलिसांनी धडक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


