सावदा शहरात चंपाषष्ठीनिमित्त ओढल्या बारागाड्या


Chariots drawn on the occasion of Champashashti in Savada city सावदा : शहरात शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या आठवडे बाजार परिसरातील खंडोबा महाराज मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त सोमवार, 18 रोजी यात्रोत्सव व बारागाड्या ओढण्यात आल्या. यावेळी सकाळी नागरीकांनी पारंपरिक पद्धतीने देवाला भरीत-भाकरीचा नेवैद्य दाखविला तसेच तळीदेखील भरण्यात आली.

दिवसभर भाविकांची गर्दी
सकाळपासून अनेकांचे कुलदैवत असल्याने येथील मंदिरात दर्शनासाठी देखील नागरिकांची गर्दी होती. सोमवारी सायंकाळी सहा वाजेदरम्यान भगत राहुल पवार व सहकारी यांनी बारागाड्या ओढल्या. ही त्यांची पाचवी पिढी असून ते परंपरेनुसार या बारागाड्या दरवर्षी ओढतात. यावेळी नागरिकांनी देखील बारागाड्या पाहण्यासाठी गर्दी केली. नागरीरकांनी दर्शन घेतले. यावेळी छोटेखानी यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !