उभ्या बल्करवर धडकली कार : भुसावळातील तीन तरुण गंभीर


Car hits a vertical bulker: Three youths from Bhusawal are serious भुसावळ : कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव कार चालकाने हायवेवर उभ्या असलेल्या बल्करवर धडकल्याने झालेल्या अपघातात भुसावळातील तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी दुपारी दोन वाजता घडला.

बल्कर आदळली कार
राष्ट्रीय महामार्गावर खडका चौफुलीजवळील मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास खडका चौफुलीजवळील सिद्धीविनायक बोअरींगजवळ बल्कर उभा असताना त्यावर स्वीप्ट कार जावून आदळली. महामार्गावर अचानक कुत्रा आल्यामुळे त्याला चुकवण्यासाठी चालकाने प्रयत्न केला मात्र यात त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ही कार हायवेवर उभी असणार्‍या राखेच्या बल्करवर जाऊन आदळली तर कुत्र्याचा या अपघातात मृत्यू झाला.



अपघातात वाहनाचे नुकसान
या भीषण अपघातात कारचा पुढील भाग चक्काचूर झाला असून चालकासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामुळे मोठा आवाज झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. रस्त्यावर बेशिस्तपणे उभे राहणार्‍या वाहनांवर कारवाई होणार कधी? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !