रस्त्यावर उभ्या ‘बल्कर’वर भरधाव स्वीप्ट आदळून भुसावळातील तरुण ठार


भुसावळ : दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून राखेची वाहतूक करणारे बल्कर रस्त्यावर बेशिस्तपणे उभे करण्यात आल्याने त्यावर भरधाव स्वीप्ट वाहन आदळून झालेल्या अपघातात तिघे तरुण गंभीर जखमी झाले होते. हा अपघात भुसावळातील खडका चौफुलीवर मंगळवारी दुपारी दोन वाजता घडला होता. या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला असून अपघात प्रकरणी बल्कर चालकाविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

कुत्र्याला वाचवताना अपघात
खडका चौफुलीजवळ टायर फुल्याने बल्कर टँकर (एम.एच.19 सी.वाय.7085) मंगळवारी दुपारी उभा होता. बल्कर चालकाने रस्त्यावर वाहन उभे करताना इंडिकेटर तसेच आजूबाजूला निशाणी लावून वाहनधारकांना सूचित करणे क्रमप्राप्त होते मात्र तसे घडले नाही. त्याचवेळी मोकाट कुत्रा अचानक रस्त्यात आल्याने जळगावकडे जाणारी भरधाव स्वीप्ट (एम.एच.04 सी.टी.8610) यावेळी बल्करवर आदळल्याने तिचा मोठा चुराडा झाला. या अपघातात मयंक चेनसिंग मेहरा (24, भुसावळ), रोशन देविदास मकारे (22, खडका रोड, भुसावळ) व ओवेश जावेद शेख (24, रा.पंधरा बंगला, भुसावळ) हे जखमी झाल्याने त्यांना गोदावरीत हलवण्यात आले.



अपघातातील तरुणाचा मृत्यू
बल्करवर स्वीप्ट आदळून झालेल्या अपघातात जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गोदावरीत हलवण्यात आले. उपचार सुरू असताना मयंक चेनसिंग मेहरा (24, भुसावळ) या तरुणाचा मृत्यू ओढवला. या अपघातात रोशन देविदास मकारे (22, खडका रोड, भुसावळ) व ओवेश जावेद शेख (24, रा.पंधरा बंगला, भुसावळ) हे दोन्ही तरुण जखमी असून त्यांच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बल्कर चालकाविरोधात गुन्हा
गोदावरी रुग्णालयात दोघा तरुणांवर उपचार सुरू असल्याने बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बेंडकुळे यांनी त्यांचा जवाब नोंदवला. त्यात आवेश जावेद शेख या तरुणाने जवाब दिल्यावरून अपघाताला कारणीभूत असलेल्या बल्कर चालकाविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !