बोरावल विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन अपात्र


Chairman of Boraval Various Executive Co-operative Societies disqualified यावल : यावल तालुक्यातील बोरावल येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमन तीन अपत्य असल्याने अपात्र ठरल्या आहेत. चेअरमन पदासह त्यांना संचालक पदावरूनदेखील त्या अपात्र घोषित करण्यात आल्या आहेत. याबाबतचा निकाल यावल येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेंच्या वतीने करण्यात आला आहे. या निर्णयामुळे सहकार क्षेत्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

तक्रारीअंती कारवाई
बोरावल, ता.यावल येथे बोरावल विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आहे. या सोसायटीच्या सार्वत्रीक निवडणूक नुकतीच झाली. त्यात चेअरमन म्हणून शशिकला समाधान चौधरी यांची निवड करण्यात आली होती. चेअरमन पदावर असलेल्या शशिकला चौधरी यांच्या संदर्भात सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यावल कार्यालयात विनोद काशिनाथ चौधरी (टाकरखेडा) यांनी तीन अपत्य असल्याने त्यांना अपात्र घोषित करण्यात यावे याबाबतचा अर्ज केला होता. सहायक निबंधक सहकारी कार्यालयात याबाबतची सुनावणी करण्यात आली. यात शशिकला समाधान चौधरी यांना तीन आपत्य असल्याचे सिद्ध झाले. सहाय्यक निबंधक एस.एफ.गायकवाड यांनी शशिकला चौधरी यांना चेअरमनपदासह सदस्य पदावरूनदेखील अपात्र घोषित केले आहे. या निकालामुळे यावल तालुक्यातील सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !