तर अधिकार्यांची नागरीक करणार धुलाई !
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या तंबीने नवीन वादाची शक्यता
नागपूर : आठ दिवसात समस्या सोडवा अन्यथा लोकांना कायदा हातात घेऊन तुमची धुलाई करण्यास सांगेल, अशी तंबी दिल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याने नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. परीवहन विभागाच्या बैठकीत अधिकार्यांना ही तंबी दिल्याचे कबुली स्वतः गडकरी यांनी एमएसएमई सेक्टरमध्ये लघू उद्योग भारतीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या कार्यक्रमात दिली.
न्याय न देणार्या व्यवस्थेला फेकून द्यायला हवे
जी व्यवस्था न्याय देत नाही तिला आपण फेकून द्यायला हवं असं आपल्या शिक्षकांनी शिकवल्याचेही गडकरी यांनी सांगत आपण अधिकार्यांनी काम न केल्यास त्यांची लोकांना सांगून धुलाई करू, अशी तंबी दिल्याचे सांगितले. गडकरी म्हणाले, आज मी परिवहन कार्यालयात एक बैठक घेतली. ज्यात परीवहन आयुक्त सुद्धा उपस्थित होते. मी त्यांना म्हंटलं की तुम्ही आठ दिवसांच्या आत लोकांच्या समस्या सोडवा अन्यथा लोकांना कायदा हातात घ्यायला सांगून तुमची धुलाई करायला सांगीन. एमएसएमई सेक्टरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या लघु उद्योग भारतीच्या कार्यक्रमाला गडकरी उपस्थित होते. यावेळी त्यांनी वरील वक्तव्याची माहिती दिली. तुम्ही सरकारी नोकर आहात. मी लोकांमधून निवडून आलो आहे. मी लोकांना उत्तर देण्यास बांधील आहे. जर तुम्ही चोरी करत असाल तर मी तुम्हाला एक चोर म्हणीन. तसेच या अधिवेशनात सहभागी झालेल्या उद्येाजकांनी कुठलीही भीती मनात न बाळगता व्यवसाय करा, अधिकारी तुम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत, असेही गडकरी म्हणाले.