चाळीसगावात लग्नाच्या जेवणातून शंभरावर वर्‍हाडींना विषबाधा

चाळीसगाव शहरातील अनेक रुग्णालयात उपचार सुरू : चौघांची प्रकृती गंभीर


Over 100 wedding guests poisoned in Chalisgaon चाळीसगाव : लग्नातील जेवणातून सुमारे 100 वर्‍हाडींना विषबाधा झाल्याची दुर्घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. विषबाधा झालेल्यांना उपचारासाठी शहरातील विविध खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात तरुण, वृद्ध व महिलांचा समावेश असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, चौघा ज्येष्ठ महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

विषबधाने चाळीसगाव तालुक्यात खळबळ
ही विषबाधा कोणत्या अन्नातून झाली? याबाबत माहिती मिळाली नाही. बाधितांची संख्या वाढल्याने अनेक वर्‍हाडी भयभीत झाले आहेत. गुरुवार, 21 रोजी दुपारी हिरापूर येथील एका कुटुंबातील मुलाचा विवाह शहरातील हिरापूररोड असलेल्या लॉन्स येथे पार पडला. या लग्नात जेवणाच्या पंगती पार पडत होत्या. याच जेवणावळीतून अनेकांना उलटी, मळमळ अशाप्रकारचा त्रास जाणवू लागला. उपचारासाठी दाखल झालेले अनेक जण असले तरीही या लग्नातून जेवण करून गेलेल्या बाहेरगावच्या पै-पाहुण्यांची काय परिस्थिती आहे? ते समजू शकले नाही. त्यामुळे बाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज शंभर पेक्षा अधिक असल्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबतचे वृत्त ‘दैनिक लोकमत’ ने आज दिले आहे.



चौघा महिलांचा रक्तदाब कमी
सुमारे चार ज्येष्ठ महिलांचा बीपी कमी झाल्याने त्यांची प्रकृती स्थिर नाही.इतर रुग्णांची तपासणी सुरू असून त्यांचेवर उपचार सुरू असल्याचे आराध्या हॉस्पिटलचे डॉ.अभिषेक अग्रवाल यांनी सांगितले.

शहर पोलिसात नोंद नाही
या घटनेबाबत शहर पोलिसात कुणीही खबर दिलेली नाही.त्यामुळे या घटनेची माहिती नसल्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !