मुक्ताईनगरात तीन लाखांचा गुटखा जप्त : बर्हाणपूरच्या चालकाला अटक
Gutkha worth three lakh seized in Muktainagar : driver of Barhanpur arrested मुक्ताईनगर : शहरातील प्रवर्तन चौकात मध्यप्रदेशातून आलेला तीन लाख 10 हजारांचा गुटखा पोलिसांच्या पथकाने जप्त केल्याने गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शेख आबीद शेख जहीर (30, रा.राजघाट, काली मशिदजवळ, बर्हाणपूर, मध्यप्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. शहरातील प्रवर्तन चौकात वॅगन आर चारचाकी (एम.पी.68 झेड.ए.9862) आल्यानंतर तिची झडती घेतली असता त्यात मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा असल्याने वाहन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी पंचांसमक्ष गुटख्याची मोजणी केल्यानंतर वाहनातून तीन लाख 9 हजारांचा गुटखा, तंबाखू व पाच लाख 20 हजार रुपये किंमतीची कार जप्त करण्यात आली. कार चालक शेख आबीद शेख जहीर (30, रा.राजघाट, काली मशिदजवळ, बर्हाणपूर, मध्यप्रदेश) यास अटक करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते करीत आहेत.


