भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यातील हवालदार निलंबित
पोलिस अधीक्षकांचे आदेश : ऑडिओ क्लिप झाली होतीव्हायरल
Constable of Bhusawal market police station suspended भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे हवालदार सुनील जोशी यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी गुरुवारी तडकाफडकी निलंबित केले आहे.
या कारवाईने जळगाव जिल्हा पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली. मारहाणीच्या प्रकरणात संशयित आरोपीसोबत जोशी यांचे संभाषण झाले होते व त्याबाबतची ऑडिओ क्लीपही व्हायरल झाली होती. ही क्लीप पोलिस दलापर्यंत पोहोचल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक एम.राजकुमार म्हणाले.


