वरणगाव शहरातील प्रौढाचा बसच्या धडकेने मृत्यू
An adult dies after being hit by a bus in Varangaon city वरणगाव : वरणगाव राष्ट्रीय महामार्गावर खासगी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास घडला आहे. जगतारसिंग बिक्करसिंग बिलींग (45, रा.वरणगाव) असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
खाजगी बसच्या धडकेने मृत्यू
वरणगाव येथे जगतारसिंग उर्फ तारा बिक्करसिंग बिलींग हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. शनिवार, 23 डिसेंबर रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ते त्यांच्या दुचाकीने घरी जात असतांना त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने येणार्या खासगी बस (क्रमांक एम.एच.40 ए.टी.0289) ने जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. खासगी बस चालक वाजीद असमत अली (जयहिंद नगर, नागपूर) विरोधात गुन्हा दाखल झाला.


