वांजोळा शिवारात अनोळखीचा मृत्यू


Death of a Stranger in Wanjola Shivar भुसावळ : वांजोळा शिवारात 30 ते 35 वर्षीय अनोळखीचा शनिवार, 23 रोजी मृतदेह आढळला. वांजोळा पोलिस पाटील संतोष भिका पाटील यांनी याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

ओळख पटवण्याचे आवाहन
वांजोळा शिवारातील मिरगव्हाण रोडलगत सोनाली सुशील जैन यांच्या शेतात अनोळखी इसम मयत स्थितीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी धाव घेतली. मयताच्या उजव्या मनगटावर डीकेएस गोंदलेले आहे. अंगात ग्रे रंगाची नाईट पँट, काळ्या रंगाचे फुलबाहीचे स्वेटर असे वर्णन आह.े तपास सहाय्यक निरीक्षक अमोल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !