पळासखेडा येथील २२ वर्षीय विवाहित तरुणाची आत्महत्या
बोदवड : तालुक्यातील पळासखेडा बु. येथील एका २२ वर्षीय विवाहित तरुणाने काहीतरी विषारी पदार्थ सेवन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची दुदैवी घटना मंगळवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. प्रदुम प्रताप चव्हाण असे आत्महत्या केलेल्या विवाहात तरुणाचे नाव आहे. मयत प्रदुम चव्हाण हा ११ रोजी सकाळी घराच्या बाहेर निघून गेला होता. घरच्या मंडळींनी त्याचा शोध घेतला असता तो पळासखेडा ते शेलवड रस्त्यावरील माणिक रामकृष्ण चव्हाण यांच्या मालकीच्या शेतात काहीतरी विषारी पदार्थ सेवन करून मृत अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी जयसिंग गणपत चव्हाण (६५ रा.पळासखेडा ता.बोदवड) यांच्या खबरीवरून बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वसंत निकम करीत आहेत. मयत प्रदुम चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, वडील असा परीवार आहे.
