चुंचाळे गावातून अवैद्य वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पळवले
A tractor transporting untreated sand ran away from Chunchale village यावल : यावल तालुक्यातील चुंचाळे गावात सुखनाथ बाबा मंदिराच्या जवळ अवैध वाळू वाहतूक करणार्या ट्रॅक्टरला तलाठ्याने पकडल्यानंतर हे ट्रॅक्टर कारवाईकरीता यावल तहसील कार्यालयात नेले जात असताना दोघांनी ट्रॅक्टर पळवून नेले. याप्रकरणी यावल पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात यावल पोलिसात गुन्हा
चुंचाळे, ता.यावल या गावात तलाठी मिलिंद वासुदेव कुरकुरे यांनी गस्तीवर असताना सुकनाथ बाबा मंदिराजवळ निळ्या रंगाचे ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात असल्याचे दिसताच तलाठी यांनी ट्रॅक्टर पकडले. ट्रॅक्टर व ट्रॉली ही तहसील कार्यालयात नेण्या कामी ते कारवाई करत असतांना नाना रतिलाल कोळी व बापू सुरेश कोळी (दोघे राहणार विदगाव, ता.जळगाव) यांनी सदर ट्रॅक्टर पळवून नेले. याप्रकरणी तलाठी मिलिंद कुरकुरे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वासुदेव मराठे करीत आहे.


