मांगलवाडी-लूमखेडा परिसरात प्रथमच बिबट्याचे दर्शन


खिर्डी : येथून जवळच असलेल्या मांगलवाडी व लूमखेडा शिवारात शुक्रवारी रात्री आठ वाजे दरम्यान बिबट्याचे दर्शन झाले. तांदलवाडी येथून हतनूर धरण रस्त्याने जातांना वाटेत मांगलवाडी व लूमखेडा अश्या दोन गावांची शीव लागतात. शुक्रवारी, 29 रोजी रात्री आठ वाजे दरम्यान धरणाकडून तांदलवाडीमार्गे वाघाडी, ता.रावेर येथील शुभम पाटील, स्वप्नील पाटील, बाळू पाटील, कुंदन कोळी हे आपल्या खाजगी वाहनाने घरी जात असतांना त्यांच्या तवेरा वाहनसमोरून जवळपास पंधरा फूट लांब उडी मारून गव्हाच्या शेतात बिबट्या गेला.

पूर्ण वाढ झालेला असा तो बिबट्या असल्याचे त्यांनी सांगितले तसेच सांगितलेल्या ठिकाणी पाहणी केली असता खरोखरच बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. ठश्यांचे फोटो रावेर वनक्षेत्राचे वनपाल रवींद्र सोनवणे यांना दाखविले असता ते एखाद्या वेळी तडसाचे असू शकतात, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. परिसरातील शेतकर्‍यांनी घाबरून न जाता सतर्क राहावे व रात्री उशिरापर्यंत शेतात थांबू नये, गरज असल्यास एकापेक्षा जास्त व्यक्तीने राहावे व बॅटरीचा वापर करावा. आक्षेपार्ह पायाचे ठसे आढळून आल्यास त्वरित संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !