जळगाव जि.प.च्या लिपिकाचा प्रताप : मद्यधूंद अवस्थेत बॅरीगेटस् तोडत तीन दुचाकीसंह चारचाकीला धडक
Clerk of Jalgaon G.P. Pratap : In a drunken state, three two-wheelers collided with a four-wheeler while breaking the barricades. जळगाव : जळगाव जि.प.तील मद्यधूंद लिपिकाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आकाशवाणीकडे येताना आकाशवाणी चौकानजीक तपासणीसाठी लावलेले बॅरीगेटस् तोडत तीन दुचाकी व एका चारचाकीला धडक दिली. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. मद्यपी कारचालकाला वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांनी पाठलाग करून पकडले. ही प्रकार शनिवार, 30 डिसेंबर रोजी रात्री सव्वानऊ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ते आकाशवाणी चौकादरम्यान घडला. प्रेमराज सुभाषराव वाघ (36, दहिवद, ता.चाळीसगाव) असे अपघाताला कारणीभूत असलेल्या चालकाचे नाव आहे.
मद्यधूंद अवस्थेत अपघात
प्रेमराज वाघ हा जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे. शनिवार, 30 डिसेंबर रोजी रात्री तो कारमधून (एम.एच.12 एम.एफ. 9481) द्वारे स्वातंत्र्य चौकाकडून आकाशवाणी चौकाकडे जात होता. यावेळी 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेच्यावतीने आकाशवाणीनजीक बॅरीगेटस लागून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. त्या ठिकाणी लावलेल्या बॅरीगेट्सजवळ हा कारचालक न थांबता बॅरीगेट्सला उडवून सुसाट निघाला. त्यात पुढे असलेल्या तीन दुचाकी व एका चारचाकी वाहनाला त्याने धडक दिली. यामध्ये वाहतूक शाखेचे कर्मचारी गुणवंत देशमुख, छोटू माधव बोरसे, सिद्धी छोटू बोरसे हे जखमी झाले. या ठिकाणी हजर असलेले वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डी.डी. इंगोले, हवालदार चंद्रकांत पाटील, योगेश पाटील, गुणवंत देशमुख, भाऊराव घेटे, किरण मराठे, विजय पाटील, पंडित साळी यांनी या कारचालकाचा पाठलाग करून त्याला सर्कल जवळच पकडले. या ठिकाणी संतप्त नागरिक त्याला चोप देणार होते, मात्र वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांनी त्याला ताब्यात घेऊन जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात आणले.


