दोन कट्टे व पाच काडतुसांसह परप्रांतीय शस्त्रतस्कर शिरपूर पोलिसांच्या जाळ्यात


A foreign arms smuggler with two knives and five cartridges in the net of Shirpur police शिरपूर : शिरपूर पोलिसांनी गोपनीय माहितीवरून परप्रांतीय शस्त्रतस्कराला बेड्या ठोकल्या आहेत. संशयिताकडून 50 हजार रुपये किंमतीचे दोन गावठी कट्टे व पाच जिवंत काडतूस जप्त करण्यात आली. या कारवाईने शस्त्र तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. प्रयागसिंग देवीसिंग जोधा (27, भुरूजगड, ता.फलसुुंड, जि.जैसलमेल, राजस्थान) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूरचे निरीक्षक अन्साराम आगरकर यांना शस्त्र तस्कराबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. रविवार, 31 रोजी सायंकाळी सात वाजता बसस्थानकाकडून गुजराथी कॉम्प्लेक्सकडे एक संशयित पायी येत असताना पथकाने त्यास ताब्यात घेतले व झडतीअंती त्याच्याकडून पाच हजार रुपये किंमतीचे पाच जिवंत काडतूस तसेच 50 हजार रुपये किंमतीचे दोन गावठी कट्टे व 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल आढळल्याने तो जप्त करण्यात आला.






यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश कुटे, पोलिस उपनिरीक्षक संदीप दरवडे, नाईक राजेंद्र रोकडे, दीपक खैरनार, विवेकानंद जाधव, भूपेश गांगुर्डे, चालक विजय पाटील आदींच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !