मुंबई महामार्गावर भीषण अपघातात तिघे ठार
Three killed in horrific accident on Mumbai highway ईगतपुरी : भरधाव मर्सिडीज आयशरवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघे ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई महामार्गावर बोरर्टेंभे येथे घडला. भरधाव वेगातील मर्सिडीज कार भाजीपाला घेऊन जाणार्या आयशरवर धडकली. सोमवारी पहाटे चार वाजेच्या वेळी हा अपघात झाला.
अपघातस्थळी अनेकांची धाव
मर्सिडीज (एम.एच.02 ई.एक्स 6777) या क्रमांकाच्या मर्सिडीज कारचा अपघातात चक्काचूर झाला. जखमींना पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुट पेट्रोलिंग टीम, टोल प्लाझा रुग्णवाहिका आणि महामार्ग पोलिस घोटी यांनी अपघाताची माहिती समजताच मदतकार्य केले.









