भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यावर चाकूहल्ला करणार्‍या संशयित तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या


Suspected young man who stabbed an employee of Bhusawal market police station committed suicide under the train भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यावरच 22 वर्षीय तरुणाने चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना शहरातील गडकरी नगराजवळील शिवदत्त नगर परीसरात रविवारी दुपारी दोन वाजता घडली होती. या घटनेतील संशयित आरोपी तरुणाने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडालीआहे.सुनील व्यंकय्या मैलेलू (22, भुसावळ) असे आत्महत्या करणार्‍या तरुणाचे नाव आहे.

मदतीसाठी आलेल्या पोलिसावर केला हल्ला
कौटुंबिक वादानंतर मुलाकडून आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्रस्त पित्याने 112 हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून मदतीची मागणी केल्यानंतर मदतीसाठी गेलेल्या बाजारपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी अक्षय चव्हाण यांच्यावर संशयित तरुणाने हल्ला केला होता.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !