भुसावळातील युवकाला ठार मारण्याची धमकी देत मारहाण : तिघांविरोधात गुन्हा


Bhusawal youth assaulted by threatening to kill : Crime against three भुसावळ  : किरकोळ वादातून भुसावळातील 19 वर्षीय युवकाला ठार मारण्याची धमकी देत मारहाण करण्यात आली. ही घटना जामनेर रोडवरील सिंधी कॉलनीसमोर तृप्ती डेअरीजवळ रविवार, 31 रोजी रात्री 11.30 वाजता घडली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्रिकूटाविरोधात गुन्हा दाखल
नोमान रजा शेख अलीम (19, बत्तीस खोली, सिटी हॉस्पीटलमागे, भुसावळ) या तरुणाच्या तक्रारीनुसार, 31 रोजी रात्री 11.30 वाजता संशयितांनी रस्ता अडवत शिविगाळ करीत तसेच तोंडावर व नाकाजवळ चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कुणाल दिनेश पाटील (शनी मंदिर वॉर्ड), गोपी अनिल धामणे व आकाश राजेश पारधे (दोन्ही रा.वाल्मीक नगर, भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार नेव्हील जॉर्ज करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !