जेवणाचे पैसे मागितल्यावरून भुसावळात तरुणावर चाकूहल्ला : दोघांविरोधात गुन्हा
Knife attack on youth in Bhusawal for asking for food money: Crime against two भुसावळ : हॉटेलमध्ये जेवणाचे पैसे मागितल्याच्या वादातून तरुणावर चाकूहल्ला करण्यात आला तर दोघांना शिविगाळ करीत मारहाण करण्यात आली. ही घटना नववर्षाच्या दिवशी 1 रोजी रात्री 12.15 वाजता घडली. याप्रकरणी दोघांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पैसे मागितल्यानंतर मारला चाकू
यश रघुनाथ तपकिरे (अयोध्या नगर, शांतीनिकेतन जवळ, जळगाव) याच्या तक्रारीनुसार, शहरातील उंट मोहल्ला भागातील हॉटेल रूचीमध्ये दोघे संशयित जेवणासाठी आल्यानंतर त्यांना जेवण झाल्यानंतर बिल मागितल्याचा राग आला. फिर्यादीस प्रदीप कोळी याने शिविगाळ करीत धक्काबुक्की केली तर दुसरा संशयित विजय पवार याने फिर्यादी व महेश जाधव तसेच जसवंतसिंग राजपूत यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत ठार मारण्याची धमकी देत सोबत आणलेल्या चाकूने जसवंत सिंग यांच्या उजव्या डोळ्यावर केला. या हल्ल्याने डोळ्याला गंभीर दुखापत झाली तसेच डाव्या हाताच्या बोटालाही दुखापत झाली. तपास सहाय्यक निरीक्षक हरीष भोये करीत आहेत.


