कुर्‍हाकाकोडातील महिलेचे 64 हजारांचे मंगळसूत्र लांबवले


Mangalsutra of Kurhakakoda woman of 64 thousand was extended जळगाव : जळगाव शहरातील टॉवर चौकात उभ्या असलेल्या महिलेच्या पर्समधून रोख रक्कमेसह सोन्याचे मंगळसूत्र मिळून 63 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला. हा प्रकार शुक्रवार, 5 जानेवारी रोजी दुपारी घडली. याबाबत जळगाव शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.

अज्ञातांनी लांबवला ऐवज
सुलोचना काशीनाथ चौधरी (66, कुर्‍हाकाकोडा, ता.मुक्ताईनगर) या कामानिमित्ताने शुक्रवार, 5 जानेवारी रोजी जळगाव शहरात खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. दुपारी चार वाजेच्या सुमारास शहरातील टॉवर चौकामधील जावळेकर कचोरीच्या दुकानासमोर उभे असताना त्यांच्या पर्समधून सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम असा एकूण 63 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चोरट्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर रात्री आठ वाजता त्यांनी जळगाव शहर पोलिसात तक्रार नोंदवली. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक योगेश पाटील हे करीत आहे




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !