भुसावळात भर बाजारातून चोरट्यांनी दिवसा लांबवली दुचाकी
भुसावळ : शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कर्मचार्याची दुचाकी चोरट्यांनी भरदिवसा लांबवली. ही घटना रविवारी दुपारी बारा वाजेनंतर घडली. सेवानिवृत्त कर्मचारी अशोक वारके (67, हनुमान नगर, मोठा हनुमान मंदिरासमोर) हे रविवारी भाजीपाला बाजारात आल्यानंतर त्यांनी दुचाकी )(क्रमांक एम.एच.19 बी.एन.2744) ही म्युन्सीपल हायस्कूलच्या बाजूच्या गल्लीत लावली होती.
बाजारातून भाजी आणल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांच्या आत चोरट्यांनी दुचाकी लांबवली. भर दिवसा चोरट्यांनी दुचाकी लांबवल्याने दुचाकी चालकांमध्ये खळबळ उडाली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात माहिती कळवण्यात आली आहे.


