दुचाकी नाल्यात कोसळून विचव्यातील भाजीपाला विक्रेता ठार : भावासह दोघे गंभीर
A vegetable seller in Vichwa was killed when his two-wheeler fell into a drain: two of them, including his brother, were seriously injured भुसावळ : दुचाकीसमोर डुकरे आल्याने नियंत्रण सुटलेली दुचाकी नाल्यात कोसळली. या अपघातात एका भावाचा मृत्यू ओढवला असून दुसरा भाऊ व मित्र गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवार, 7 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कुर्हे-मोंढाळेदरमयान घडला. या अपघातात गजानन एकनाथ होंडाळे (23) या तरुणाचा मृत्यू झाला गोकुळ एकनाथ होंडाळे (21) व त्यांचा मित्र गजानन जगदेव कारगोळे (सर्व रा. विचवा, ता. बोदवड) हे गंभीर जखमी झाले.
भाजीपाला विक्रीनंतर परतीच्य प्रवासात अपघात
विचवा येथील तिघे भुसावळातील रविवारच्या बाजारात भाजीपाला विक्रीसाठी आले होते. भाजीपाला विक्री झाल्यानंतर परतीच्या प्रवासामध्ये कुर्हे-मोंढाळेदरम्यान रस्त्यात अचानक डुकरे आली व दुचाकी (एम.एच.19 बी.डब्ल्यू.8108) नाल्यात कोसळली. या अपघातात गजानन होंडाळे याचा मृत्यू ओढवला तर गोकुळ होंडाळे व गजानन कारगोळे गंभीर जखमी झाले. या अपघात प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला. तपास हवालदार दीपक जाधव करीत आहे.


