यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार : एकाला अटक
Minor girl assaulted in Yaval taluka : One arrested यावल : यावल तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करीत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी 24 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली. तरुणाने या मुलीचे अपहरण करून औरंगाबाद व जळगाव येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले. संशयिताला 11 जानेवारीपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पळवून नेत केला अत्याचार
यावल तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने आमीष दाखवून फुस लावून पळवून नेले होते. ही घटना 15 नोव्हेंबर 2023 रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी यावल पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे, हवालदार श्याम धनगर, महिला पोलिस सारीका वाणी यांनी केला. अल्पवयीन मुलीला सलमान कादर तडवी (24, यावल तालुका) याच्यासह ताब्यात घेतले.


पीडित अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता तिने सांगितले की, आपल्यावर या तरुणाने औरंगाबाद व जळगाव येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. या गुन्ह्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून सुरक्षा कायदा पोस्को अन्वये कलम वाढवून तरूणास पोलिसांनी अटक केली. तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत.
