रावेर शहरातील मदिना कॉलनीत वीज चोरी करतांना दोघांना पकडले


यावल : रावेर शहरातील उटखेडा रोडवरील मदिना कॉलनीमध्ये राज्य विद्युत वितरण कंपनीकडून वीज चोरी विरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. या ठिकाणी दोन जण वीज चोरी करतांना आढळून आले. या दोघांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिट नुसार दंड आकारून नोटीस देण्यात आली मात्र या दोघांनी दंड भरला नाही म्हणून यावल पोलिसात सोमवारी दोघांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दंड न भरल्याने गुन्हा दाखल
रावेर शहरात उटखेडा रोडवरील मदिना कॉलनीत राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता दिलीप नानकराम सुंदराणी यांनी आपल्या पथकासह वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवली. यामध्ये त्यांना शेख फारूक शेख हारून या वीज वापरकर्त्याने तथा बिलावरील नाव ईस्माईल मोहम्मद यांनी आपल्या मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी केली. त्यांना दहा हजार 430 इतका दंड आकारून तडजोड रक्कम दोन हजार आकारून नोटीस देण्यात आली मात्र त्यांनी दंड भरला नाही तसेच याच कॉलनीत शेख शब्बीर शेख रहमान हे वापरकर्ते तथा बिलाचे नाव रीहाना बी.शेख शब्बीर यांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे उघडकीस आले व त्यांना 15 हजार 407 रुपये तसेच तडजोड दोन हजार रुपये आकारणी करीत दंडाची नोटीस देण्यात आली मात्र त्यांनीदेखील दंड भरला नाही. दोघांनी दंड न भरल्याने यावल पोलिसात सहायक अभियंता दिलीप सुंदराणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक किशोर परदेशी करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !