भुसावळातील शिवाजी नगरातून 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली
A two-wheeler worth Rs 30,000 was extended from Shivaji Nagar in Bhusawal भुसावळ : वरणगाव रोडवरील शिवाजी नगर भागातून चोरट्यांनी 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. हा प्रकार 4 रोजी मध्यरात्री घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहर व परीसरात दुचाकी चोरींचे सत्र सुरू असल्याने वाहनधारक धास्तावले आहेत. पवन प्रकाश चौधरी (30, शिवाजी नगर, वरणगाव रोड, भुसावळ) हे मजुरी काम करतात व त्यांच्याकडे वापरासाठी दुचाकी (एम.एच.19 बी.डब्ल्यू.3274) आहे. 4 रोजी 12 ते दिड वाजेदरम्यान घराबाहेर त्यांची दुचाकी पार्क केल्यानंतर चोरट्यांनी संधी साधली. तपास हवालदार रमण सुरळकर करीत आहेत.


