अंतुर्लीत भरदिवसा धाडसी घरफोडी : पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास
Audacious house burglary in Anturli in broad daylight : 250,000 instead of 200,000
मुक्ताईनगर : शहरी भागानंतर चोरट्यांनी आपला डेरा आता ग्रामीण भागाकडे वळवला असून तालुक्यातील अंतुर्ली येथे झालेल्या धाडसी घरफोडीने परीसरात घबराट पसरली आहे. बंद घरातून चोरट्यांनी तब्बल एक लाख 84 हजारांचा ऐवज लांबवल्याचा प्रकार बुधवार, 10 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी एक वाजेदरम्यान घडला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
धाडसी घरफोडीने खळबळ
अंतुर्ली येथे विलास वसंत महाजन (28, नरवेल रोड, अंतुर्ली) हे परीवारासह वास्तव्यास असून त्यांचे गावात मोबाईल शॉप आहे. बुधवार, 10 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी एक दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप उघडून 20 हजारांच्या रोकडसह एक लाख 84 हजारांचा ऐवज लांबवला. दुपारी महाजन परीवारातील सदस्य घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले.


पोलिस अधिकार्यांची धाव
चोरट्यांनी गोदरेज कपाटातील लॉकरमधून 20 हजारांची रोकड, 82 हजार रुपये किंमतीची व 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चीप, 55 हजार रुपये किंमतीचे 10 ग्रॅम वजनाचे मणी, 27 हजार रुपये किंमतीचे कानातले असा एकूण एक लाख 84 हजारांचा मुद्देमाल लांबवला. मुक्ताईनगर पोलिसांना सूचित केल्यानंतर पोलिस उपअधीक्षक राजकुमार शिंदे, पोलिस निरीक्षक नागेश मोहिते, गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक निलेश राजपूत व सहकार्यांनी भेट देत पाहणी केली.
