वाघोद्यातील तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह
The body of a young man from Waghoda was found in a well रावेर : रावेर तालुक्यातील वाघोदा बु.॥ अतुल प्रभाकर वाघ (22) या तरुणाचा वाघोदा बु.॥ शिवारातील विहिरीत मृतदेह आढळला. तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही.
गोपाल नथ्थू पाटील यांची शेत गट क्रमांक 743 मध्ये विहिर असून बुधवारी अतुल वाघ या तरुणाचा विहिरीतील पाण्यात तरंगताना मृतदेह आढळला. याप्रकरणी सावदा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार संजीव चौधरी करीत आहेत.


