भुसावळातील सिंधी कॉलनीत नॉयलॉन मांजा जप्त
Nylon manja seized in Sindhi Colony in Bhusawal भुसावळ : नॉयलॉन मांजावर कारवाईचे आदेश जिल्हा पोलिस प्रशासनाकडून मिळाल्यानंतर जळगाव गुन्हे शाखेने सिंधी कॉलनीतून एक हजार 600 रुपये किंमतीचा बंदी घातलेला नॉयलॉन मांजा जप्त केला आहे. ही कारवाई गुरूवारी दुपारी करण्यात आली.
विक्रेत्यांची जामिनावर सुटका
पोलिस कर्मचारी रणजीत जाधव यांनी सिंधी कॉलनीतील आदर्श हायस्कूलजवळ असलेल्या करण दिलीपकुमार लुल्ला यांच्याकडे नॉयलॉन मांजा असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करीत एक हजार 600 रुपये किंमतीच्या मांजाच्या चक्री जप्त केल्या. पोलिसांनी संशयीत लुल्ला यांना अटक करून त्यांना जामिनावर सोडले. तपास पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मिलिंद कंक तपास करीत आहे.


