ऐनगाव शिवारातून गुरा-ढोरांसह शेती साहित्याची चोरी
Theft of farm material including cattle from Aingaon Shiwar बोदवड : बोदवड तालुक्यातील ऐनगाव शिवारातील शेतातून चोरट्यांनी पशूधनासह शेती साहित्याची चोरी केली. ही घटना 12 ते 13 जानेवारीदरम्यान घडली. याप्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरट्यांचा मोर्चा शेत-शिवाराकडे
प्रतापसिंग उदेसिंग पाटील (66, एणगाव) व अनिल रामचंद्र वराडे यांचे ऐनगाव शिवारात शेत गट क्रमांक 196 मधील शेडमधून अज्ञात चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीची म्हैस व 20 हजार रुपये किंमतीचा गीर जातीचा गोर्हा तसेच लोखंडी प्लेटा, पाण्याची मोटार, लोखंडी अँगल व आसारी असा एकूण 40 हजारांचा मुद्देमाल लांबवला. प्रतापसिंग पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार उद्दल चव्हाण करीत आहेत.


