वरणगावातील तरुणाचा दुचाकी घसरल्याने मृत्यू


भुसावळ  : दुचाकी घसरून डोक्याला जबर दुखापत झाल्याने शहरातील रामपेठ भागातील तरुणाचा मृत्यू ओढवला. हा अपघात सोमवार, 15 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता घडला. याप्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. मनोज अशोक नाथ (33, रा.रामपेठ, वरणगाव, ता.भुसावळ) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

दुचाकी घसरल्याने अपघात
भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील रामपेठ येथे मनोज नाथ हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. सोमवार, 15 जानेवारी रोजी दुपारी मनोज हा दुचाकीने वेल्हाळे येथून घरी जाण्यासाठी निघालेला होता. विल्हाळे ते वरणगाव रस्त्यावर त्यांची दुचाकी अचानक रस्त्यावर घसरली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रस्त्यावरील ग्रामस्थांनी धाव घेवून त्याला खाजगी वाहनाने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. यावेळी रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी होती. स्वतःचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याप्रकरणी मयताचे वडिल अशोक नाथ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीस्वाराविरोधात वरणगाव पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !