वरणगाव शहरात अज्ञातांनी दुचाकी पेटवली
Unidentified people set fire to a bike in Warangaon town भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथील सिध्देश्वर नगर भागात घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञातांनी सोमवारी रात्री पेटवून दिली. या घटनेमुळे परीसरातील वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली. याप्रकरणी वरणगाव पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
वरणगाव शहरातील सिध्देश्वर नगर भागात सोमवारी रात्री याच भागातील रहिवासी शेख अकरम शेख अकील यांच्या वडीलांच्या नावे नुकतीच घेतलेली हिरो होंडा कंपनीची दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी. 8251) ही सोमवारी रात्री घरासमोर लावली असताना रात्री 11.30 वाजेच्या सुमारास अज्ञातांनी दुचाकीवर ज्वलनशील पदार्थ टाकुन पेटवून दिली. आगीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी पेटलेल्या दुचाकीला विझवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना अपयश आले. आगीबाबत शेख अक्रम शेख अकील (28, सिध्देश्वर नगर) यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नागेंद्र तायडे करीत आहेत.


