भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक सहामध्ये रंगल्या नमो चषक स्पर्धा


Namo Cup competition was held in ward number six of Bhusawal city भुसावळ : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे नमो चषकाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात खास महिलांसाठी संगीतखुर्ची आणि रस्सी खेच स्पर्धेचे आयोजन प्रभाग क्रमांक सहामध्ये शुक्रवार, 26 जानेवारी रोजी करण्यात आले. या स्पर्धेचे भाजपा सरचिटणीस श्रेयस इंगळे यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले.

आमदारांची उपस्थिती
महिलांच्या तसेच प्रभागातील नागरीकांच्या उत्स्फूर्त सहभागाने व आमदार संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन महिला प्रतिष्ठा मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिता आंबेकर, महिला आघाडी सरचिटणीस वैशाली सैतवाल, बेटी बचाव-बेटी पढाव अभियान भुसावळ शहरच्या अध्यक्षा भारती वैष्णव, जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे. भाजपा शहराध्यक्ष युवराज लोणारी, युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव आवटे, सरचिटणीस रमाशंकर दुबे, राजू कुलकर्णी, माजी नगरसेवक प्रमोद नेमाडे, शेखर इंगळे, वासंती इंगळे आदींची उपस्थिती होती. स्पर्धेचे पंच म्हणून रेखा पाटील व अ‍ॅड.मनप्रीत कौर, गायत्री जोशी यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन तुषार चिंधळे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परीसरातील युवा कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !