भुसावळ लिनेस क्लब प्रेसिडेंट पदी प्रियंका चौधरी

सेक्रेटरीपदी उज्ज्वला बागुल तर ट्रेझररपदी प्रचना तांबोळी


Priyanka Chaudhary as Bhusawal Linness Club President भुसावळ : शहरातील लीनेस क्लबच्या प्रेसिडेंटपदी प्रियंका किरण चौधरी यांची निवड करण्यात आली. सेक्रेटरीपदी उज्वला बागूल तर ट्रेझररपदी प्रचना तांबोळी यांची निवड करण्यात आली. प्रियंका चौधरी यांच्या निवासस्थानी नुकताच लीनेसचा पदग्रहण सोहळा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रसंगी जळगाव येथील रीझन चेअर पर्सन दर्शना ललवाणी व पास्ट डिस्ट्रीक्ट प्रेसिडंट लता बनवट उपस्थित होत्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रतिज्ञेचे वाचन उज्वला बागुल यांनी केले. प्रसंगी रीझन चेअर पर्सन दर्शना ललवाणी व पास्ट डिस्ट्रीक्ट प्रेसिडंट लता बनवट, भुसावळ लीनेस प्रेसिडेंट प्रियंका चौधरी यांनी मनोगतातून लीनेसचे कार्य व महती विषद केली. उपस्थित महिलांनी मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करीत उखाणे घेऊन सौभाग्याचे वाण लुटले. हळदीकुंकू , तिळगुळ व वाण (भेटवस्तू ) देण्यात महिलांचा सन्मान करण्यात आला.



लीनेस नवनिर्वाचीत कार्यकारीणी अशी –
अध्यक्ष प्रियंका किरण चौधरी, सचिव उज्वला बागूल, खजिनदार प्रचना तांबोळी यांच्यासह सदस्यांमध्ये मनिषा धांडे, पल्लवी जाधव, आरती बारवसे, अजिता वडनेरे, आरती ठाकूर, उज्वला पाटील, रीना गायकवाड, जया इंगळे, अनिता इंगळे, कविता महाले आदीचा समावेश आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !