भुसावळातील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये वार्षिक पारीतोषीक वितरण
भुसावळ : शहरातील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये वार्षिक पारीतोषीक वितरण व स्नेह संमेलनाचा कार्यक्रम उत्साहात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, डीवायएसपी कृष्णांत पिंगळे, आमदार संजय सावकारे, सुभेदार मेजर प्रेमसिंग, सुभेदार जहीर अहमद, पीएचएम अमोल साळुंखे, बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सेक्रेटरी डॉ.संगीता बियाणी, रोनक बियाणी, आयुषी बियाणी, राजू बियाणी, प्राचार्य डी.एम.पाटील, रुद्रसेन गंठीया, कांचन जोशी, गोपाळ ठाकूर, राजेश पारीख, प्रवीण भराडीया, निर्मल दायमा उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी जिंकली उपस्थितांची मने
सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्वांची मने जिंकली. हॉर्स रायडिंग, मोटार पिरॅमिड, बांबू डान्स, सेक्शन अटॅक, लावणी नृत्य, कराटे, देशभक्तीपर नृत्य, रीदेमिक डांस, भारतीयम, मल्लखांब, रायफल शुटींग, वेस्टन डान्स, घोडसवारी असे विविध कलागुण विद्यार्थ्यांनी सादर केले. सातशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचलन अलीना खान व श्रेया बिर्हाडे तर आभार प्राचार्य डी.एम.पाटील यांनी मानले.








