फैजपूरला आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे यांचे स्वागत
फैजपूर : लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या तथा आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे या रावेर-यावल तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नुकत्याच फैजपूर येथे आल्या होत्या.
सामाजिक कार्यकर्ते व भीमपुत्र ग्रुपचे अध्यक्ष पप्पू मेढे यांच्या घरी त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी भीमपुत्र ग्रुपचे अध्यक्ष पप्पु मेढे व समस्त मेढे परिवाराने त्यांने स्वागत केले. बसपाचे माजी जळगाव जिल्हाध्यक्ष प्रदीप सपकाळे, मनिषा पाटील (पुणे), श्रध्दा लोकायत, (पुणे), सामाजिक कार्यकर्ते सुमित साळुंके, दिलीप सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.








