अमळनेरात उद्यापासून सारस्वतांची मांदियाळी
अ.भा.मराठी साहित्य संमेलनासाठी साहित्यिकांसह रसिक साने गुरुजी साहित्य नगरीत दाखल : प्रचंड उत्साह
Saraswat’s Mandiali from tomorrow in Amalner साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अखिल भारतीय मराठी महामंडळाचे 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शुक्रवार, 2 फेब्रुवारीपासून साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेरात सुरू होत आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यभरातील अनेक साहित्यिकांसह रसिक अमळनेरात दाखल झाले आहेत. साहित्य संमेलनामुळे सर्वत्र प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
1952 साली साहित्य संमेलन झाल्यानंतर अमळनेरात पुन्हा एकदा 72 वर्षांनी हे संमेलन 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान होत आहे. साहित्य संमेलनासाठी साने गुरुजी साहित्य नगरीत तीन सभामंडप उभारण्यात आले आहेत. यातील सभामंडप क्रमांक एकमध्ये उद्घाटन समारंभ होईल. याआधी वाडी संस्थानपासून सकाळी 7.30 वाजता ग्रंथदिंडीस प्रारंभ होईल. ग्रंथदिंडीचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे व जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते होईल.


