रावेर शेतकरी संघ निवडणूक : 20 उमेदवार निवडणूक रींगणात


Raver Shetkari Sangh Election: 20 Candidates in Election Field रावेर : रावेर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाची 11 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे. संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीत माघारीच्या अखेरच्या दिवशी 26 उमेदवारांनी माघार घेतली असून 14 जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात आहे तर एका जागेवर निवडणूक बिनविरोध झाली आहे.

एका जागेवर उमेदवार बिनविरोध
रावेर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी संचालक मंडळाच्या 15 जागांसाठी 47 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. शुक्रवारी उमेदवारी माघारीच्या अखेरच्या दिवशी दिवशी 26 अर्ज माघारी घेतल्याने आता निवडणूक रिंगणात 20 उमेदवार आहेत. भटक्या विमुक्त जाती मतदारसंघातून दोन जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी एकाने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ज्ञानेश्वर नारायण धनगर हे बिनविरोध निवडून आले.



मतदारसंघ संघनिहाय उमेदवार
सर्वसाधारण संस्था मतदारसंघ- पाच, सर्वसाधारण व्यक्तीच्या मतदारसंघात आठ, महिला राखीव मतदारसंघातून तीन, इतर मागासवर्गीय मतदार संघात दोन, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात दोन उमेदवार रिंगणात आहे. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून ज्ञानेश्वर नारायण धनगर हे बिनविरोध निवडून आले आहेत. 11 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एफ.आय.तडवी आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !