यावल शेतकी संघ निवडणुकीत सहकार पॅनलने मिळवले 16 जागांवर यश


The cooperative panel won 16 seats in the Yaval Shetthi Sangh elections यावल : यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या 16 संचालक पदाच्या निवडीसाठी झालेल्या मतदानाची सोमवारी येथील महर्षी व्यास मंदिराचे सभागृहात मतमोजणी झाली. त्यात भाजपा शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व आरपीआय प्रणीत सहकार पॅनलचे 17 पैकी 16 जागा पटकावत दणदणीत विजय मिळवला तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना (उबाठा गट) यांच्या संयुक्त शेतकरी विकास पॅनलला केवळ एक जागेवर समाधान मानावे लागले. पारंपरीक काँग्रेस -राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला शेतकी संघ महायुतीने प्रथमच काबीज केला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे उपाध्यक्ष हिरालाल चौधरी यांनी सहकार पॅनलचे तर आमदार शिरीष चौधरी माजी आमदार रमेश चौधरी यांनी शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व केले.

सोसायटी मतदारसंघात यांचा विजय
सोसायटी मतदार संघासाठी 48 सभासदांनी मतदान केले होते. या मतदार संघातून सात उमेदवार निवडून द्यावयाचे होते. विजयी झालेले उमेदवार व कंसात मिळालेल्या मतांची संख्या- सहकार पॅनलचे पांडुरंग दगडू सराफ (34) प्रवीण भास्कर वारके (31), डॉ.नरेंद्र वामन कोल्हे (30), प्रशांत लिलाधर चौधरी (28), सुनील बाळकृष्ण नेवे (28), सागर राजेंद्र महाजन (27) तर महाविकास आघाडीचे अतुल वसंतराव पाटील (25) यांनी विजय मिळविला.

व्यक्तीशः मतदारसंघ
व्यक्तीश: मतदारसंघांमध्ये पाच उमेदवार निवडून द्यावयाचे होते. यात संपूर्ण सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झाले. त्यात नरेंद्र विष्णू नारखेडे (1233), उमेश रेवा फेगडे (1160), हेमराज जगन्नाथ फेगडे (1138), धनंजय यशवंत फिरके (1113), तेजस धनंजय पाटील (970). महिला राखीव मतदार संघात दोन उमेदवार निवडून द्यावयाचे होते. यात नयना चंद्रशेखर चौधरी (1050) व आरती शरद महाजन (1163) विजयी झाल्या. नामाप्र वर्गातून नारायण शशिकांत चौधरी (बिनविरोध) तर अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातून अतुल भागवत भालेराव (988) हे विजयी झाले. विमुक्त जाती भटक्या जमाती /विशेष मागास प्रवर्गातून तुषार सांडूसिंग पाटील (1218) हे विजयी झाले.

पोलिसांचा काटेकोर बंदोबस्त
निवडणूक निर्णय अधिकारी नंदकिशोर मोरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी के.व्ही.पाटील , विजयसिंह पाटील, दस्तगीर तडवी, गोकुळ चौधरी व सहकार्‍यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

विजयी उमेदवारांचा जल्लोष
मतमोजणीनंतर खरेदी-विक्री संघाचे सभागृहात विजय सभा पार पडली. यात जिल्हा परीषदेचे माजी सभापती रवींद्र पाटील, शरद महाजन, नरेंद्र नारखेडे, नारायण चौधरी, हिरालाल चौधरी, अमोल जावळे यांनी मत व्यक्त केले आहे. सूत्रसंचलन भाजपाचे तालुका सचिव विलास चौधरी यांनी केले. मोठ्या संख्येने महायुतीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येत उपस्थित होते. त्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत डीजेच्या तालावर नृत्य जल्लोष केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !