यावल तालुक्यातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रहारमध्ये प्रवेश
प्रहारच्या ध्वजाखाली एकत्रीत यावे : अनिल चौधरी
Hundreds of office bearers and activists of Yaval taluka entered the strike यावल : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुक्यातील विविध पक्षातील हजारो कार्यकर्त्यांनी तसेच अनेक सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात जाहीर पक्ष केला. परीसराच्या कल्याणासाठी कणखरपणे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही प्रहार यावल तालुकाध्यक्ष नंदकिशोर सोनवणे यांनी दिली.
प्रहारच्या ध्वजाखाली एकत्रीत यावे : प्रहार उ.म.अध्यक्ष अनिल चौधरी
केवळ यावल तालुका नव्हे तर संपूर्ण रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातून प्रहारात प्रवेश करू इच्छिणार्यांची मोठी संख्या आहे. या भागाचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. प्रहार पक्षात सर्वधर्माचे गुण समाविष्ठ आहेत. सर्वधर्म समभावाची शिकवण देणार्या प्रहार पक्षाच्या ध्वजाखाली सर्वांनी एकत्रीत यावे व विकासाचे नवे पर्व खुले करावे, असे आवाहनही अनिल चौधरी यांनी भाषणात केले. सचिन झाल्टे यांनी सूत्रसंचालन तर गणेश बोरसे यांनी आभार मानले.


यांची होती उपस्थिती
यावेळी जळगाव शेतकरी जिल्हा उपाध्यक्ष गणेश बोरसे, जिल्हा उपाध्यक्ष विलास पांडे, जळगाव युवक जिल्हाध्यक्ष दिनेश कोळी, जळगाव मागासवर्गीय सेल जिल्हाध्यक्ष विनोद निकम, यावल माजी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी, हाजी अत्ताउल्लाह खान, अल्पसंख्यांक यावल तालुकाध्यक्ष हाजी हकीम शेख, यावल माजी नगराध्यक्ष तुकाराम बारी, अल्पसंख्यांक यावल विधानसभा क्षेत्रप्रमुख आलीम शेख, माजी नगरसेवक दिलीप वाणी, थेरोळा सरपंच व सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष शुभम पाटील, यावल युवक तालुकाध्यक्ष राकेश भंगाळे, परसाडे माजी सरपंच बबिता तडवी, यावल शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष गोकुळ कोळी, रावेर तालुकाध्यक्ष भरत लिधुरे, पिंपरूड सरपंच योगेश कोळी, सावखेडा बु.॥ सरपंच रवी महाजन, युवराज कराड, माजी सरपंच खेमचंद कोळी, माजी सरपंच तायडे, माजी नगरसेवक बिलाल शेख, अट्रावल उपसरपंच योगेश कोळी, विनोद कोळी, ग्रामपंचायत सदस्य रफिक तडवी, आमोदे सरपंच, पातोंडी सरपंच, खिरवड सरपंच, पिंप्री सरपंच, मोहगन सरपंच, सांगावी बु सरपंच, यावल-रावेर व तालुक्यातील अनेक पदाधिकारी आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित होते.






